Home खेळ स्पर्धा सीएसकेचा रेकॉर्ड ब्रेक विजय – मोडला आठ वर्षांपूर्वीचा विक्रम!

सीएसकेचा रेकॉर्ड ब्रेक विजय – मोडला आठ वर्षांपूर्वीचा विक्रम!

0

मागील काही दिवसांपासून फॉर्मात असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध काल आयपीएलच्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सने दणदणीत विजय मिळवला आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लोकेश राहुल व मयांक अग्रवालने जोरदार सुरुवात केली. सरते शेवटी ६ गडी राखून २० षटकांत १७८ धावांच लक्ष पंजाबनं सीएसके समोर उभं केलं. मात्र कालचा दिवस सीएसकेच्या नावाने सुवर्ण अक्षरात कोरला गेला. शेन वॉटसन व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी वैयक्तिक अर्धशतकासह दमदार भागीदारी करून आणि १० गडी राखून विजय मिळवून दिला.

मागील काही मॅच पाहता सीएसके कडून असे प्रत्युत्तर मिळेल, याची कल्पना कुणी केली नसावी. मागील काही मॅचेसमध्ये काहीही न करू शकलेला शेन वॉटसन पंजाबच्या गोलंदाजांवर काल प्रहारावर प्रहार करीत राहिला आणि त्याच्या जोडीला होता फॅफ ड्यू प्लेसिस. या दोघांनी मिळवून १७.४ षटकांत बिनबाद १८१ धावा केल्या. एकीकडे शेण वॉटसनने ५३ चेंडूंत ११ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ८३ धावा केल्या, तर दुसरीकडे फॅफनं ५३ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारासह ८७ धावा केल्या. IPL मध्ये एकही विकेट न गमावता मिळालेला हा दुसरा मोठा विजय आहे. लोकमतच्या रिपोर्ट नुसार याआधी कोलकाता नाइट रायडर्सने २०१७ मध्ये गुजरात लायन्सचे १८४ धावांचे लक्ष्य १० विकेट्स राखून पार केले होते.