Home खेळ स्पर्धा धोनी निवृत्त झाला!!! ट्विटर वरील हॅशटॅगने धोनी चाहत्यांना अश्रू अनावर

धोनी निवृत्त झाला!!! ट्विटर वरील हॅशटॅगने धोनी चाहत्यांना अश्रू अनावर

0

महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्त होण्याच्या चर्चा कोरोना लॉकडाऊन सुरू झाल्यापासून रंगत चालल्या आहेत. ह्या वर्षीचे IPL जेव्हा कोरोना मूळे होईल की नाही या शंकांमध्ये गुंडाळले गेले तेव्हा खरेतर धोनीची कारकीर्द आता संपली असे सर्व लोक बोलू लागले.

धोनी हा त्याचा शेवटचा सामना वर्ल्ड कप २०१९ मध्ये न्यू झिलँड विरुद्ध खेळला होता, या हृदयाचे ठोके थांबवणार्या सामन्यात जेव्हा धोनी रन आउट झाला त्यावेळी अक्षरशः भारतीय प्रेक्षकांच्या मनात चर्रर्र झाले होते. या नंतर धोनी काही दिवस अज्ञातवासात निघून गेला होता.

आज दुपारपासून सोशल मीडिया वर धोनी निवृत्त झाला असल्याचे अगदी व्हायरल झाले आहे, #dhoniretires हा ट्रेंड बघून जगभरातील धोनी चाहते नाराज झाले अनेकांनी भावनांच्या भरात धोनीच्या कारकिर्दीला सलाम करणारे व्हिडिओ आणि फोटो टाकले.

पण ह्या व्हायरल झालेल्या गोष्टीचा कुठलाच पुरावा BCCI ने दिलेला नाही तर अनेकांच्या मते हा धोनी विरोधकांचा नवीन डाव असून या आधी सुद्धा ऑक्टोबर २०१९ मध्ये अशाच प्रकारे धोनी निवृत्त झाला असल्याचे व्हायरल झाले होते.