Home खेळ स्पर्धा सिएसके संघातील ‘हा’ प्रमुख खेळाडू स्पर्धेबाहेर

सिएसके संघातील ‘हा’ प्रमुख खेळाडू स्पर्धेबाहेर

0

आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपरकिंग्स हा लोकप्रिय संघ काही विशेष कामगिरी करत नसून चाहते या संघावर सध्या नाराज आहेत. आतापर्यंत चेन्नई संघाने खेळलेल्या १० सामन्यांपैकी फक्त ३ सामने जिंकले. अशातच सिएसकेला आणखी एक मोठा धक्का बसला. सकाळ स्पोर्ट्सच्या मीडिया न्यूजनुसार चेन्नई संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो हा स्पर्धेबाहेर गेला आहे.

चेन्नई विरुद्ध दिल्ली या सामन्यात ड्वेन ब्राव्होने दमदार खेळी देऊन संघाला विजय मिळवून दिला. मात्र या प्रयत्नात तो स्वतः जखमी झाला. त्यामुळे नंतरच्या सामन्यात त्याला खेळता आले नाही. तसेच तो आता पुढील सामनेही खेळू शकणार नसल्याची माहिती सीएसकेचे सीईओ विश्वनाथ यांनी दिली.