Home खेळ स्पर्धा या पाच खेळाडूंनी पटकावले सर्वोच्च खेल रत्न पुरस्कार!

या पाच खेळाडूंनी पटकावले सर्वोच्च खेल रत्न पुरस्कार!

0

भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. त्यामध्ये पाच लोकांची नावे जाहीर करण्यात आली आहे. भारताचे उपकर्णधार रोहित शर्मा ,टेबल टेनिस चॅम्पियन माणिका बत्रा, कुस्तीपटू विणेश फोगट, हॉकीपटू राणी आणि पैलारीपिक स्वर्ण पदक विजेते मारियापंग थंगावेळू यांना जाहीर झाला आहे.

शुक्रवारी त्याची क्रीडा मंत्रालयाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. एकाच वेळी 5 पुरस्कार जाहीर होणे हे क्रीडा मंत्रालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे.

हा पुरस्कार मिळवणारा रोहित हा पाचवा खेळाडू आहे तर मोनिका ही पहिली टेनिस खेळाडू आहे. याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.