Home खेळ स्पर्धा शाहरुख खान इतका खोटारडा व्यक्ती होणे नाही : सौरव गांगुली

शाहरुख खान इतका खोटारडा व्यक्ती होणे नाही : सौरव गांगुली

0

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने शाहरुख खान विरुद्ध अत्यंत खळबळजनक वक्तव्य केले आहे. सौरव गांगुलीच्या मते, “२००८ साली IPL वेळी कर्णधारपद देते वेळी केलेलं वचनपूर्ती शाहरुख ने अजिबात केली नाही. शाहरुखने नंतर गंभीर ला कर्णधार केले त्याला त्याचे स्वायत्त दिले पण माझ्याबरोबर त्याचा व्यवहार नीट नव्हता”

सौरव गांगुली यांनी स्पष्ट केले आहे की २००८ साली KKR संघाचा कर्णधारपदी असताना जॉन बुकानंन या प्रशिक्षकाने संघात अनेक कप्तान ठेवावे लागतील अशी सूचना शाहरुख ला दिली, मी कप्तान असून सुद्धा माझ्याकडील निर्णय घेण्याची संपूर्ण शक्ती काढून घेण्यात आली. यामुळे मला माझे स्वायत्त मिळाले नाही, मी शाहरुख ला वारंवार त्याबद्दल विनंती करून सुद्धा त्याने ते ऐकलं नाही.

सौरव गांगुलीने भारतासाठी ११३ कसोटी तर ३११ वन डे सामने खेळले. KKR संघात निराशाजनक कामगिरीचा ठपका गांगुलीवर ठेवण्यात आला आणि त्याला डावलून गौतम गंभीरकडे कर्णधारपद देण्यात आले, गंभीर ला १५ कोटी रुपये देण्यात आले होते. गंभीर ने दोन वेळा IPL जिंकून दिल्यानंतर त्याच्याकडचे कर्णधार पद काढून घेऊन ते आता दिनेश कार्तिक कडे सोपवण्यात आले आहे.