Home खेळ स्पर्धा पाकिस्तानात हिंदू क्रिकेटपटूंना अतिशय वाईट वागणूक दिली, एकत्र जेवण्याचीही नाही परवानगी...

पाकिस्तानात हिंदू क्रिकेटपटूंना अतिशय वाईट वागणूक दिली, एकत्र जेवण्याचीही नाही परवानगी :शोएब अख्तरने केला गौप्यस्फोट

0

पाकिस्तानात हिंदू क्रिकेटपटूंना अतिशय वाईट वागणूक दिली जाते असा गौप्यस्फोट पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने ‘गेम ऑन है’ या शोमधून केला आहे. तो म्हणाला’ ‘पाकिस्तानात हिंदू खेळाडूंचा सन्मान केला जात नाही, त्यांनी इतरांसोबत एकत्र जेवण्यावरही आक्षेप घेतले जातात’ असा खुलासा शोएब अख्तरने केला.

हे सांगतांना शोएबने पाकिस्तानच्या दानिश कनेरिया या हिंदू खेळाडूचा उल्लेख केला. दानिशने 61 कसोटींत 261 फलंदाज बाद केले होते. तो अतिशय चांगला गोलंदाज होता. मात्र त्याला पाकिस्तानी संघामध्ये चांगली वागणूक मिळाली नाही. शोएब अनेकदा दानिश सोबत जेवायला बसत असे. मात्र संघातील इतर खेळाडू त्याच्यासोबत का जेवतो अशा टोचण्या शोएबला देत असत. शोएब म्हणाला, ‘या एका कारणावरून अनेकांसोबत माझे भांडण झाले आहे.’ पाकिस्तान दहशतवादी हल्ल्यांमुळे जगभरात बदनाम आहेच; आता या अशा वागण्याने पाकिस्तानची अजूनच नाचक्की होत आहे.