Home खेळ स्पर्धा रिकाम्या मैदानात होणार भारत विरुद्ध आफ्रिका सामने; आयपीएल सुद्धा पुढे ढकलले!

रिकाम्या मैदानात होणार भारत विरुद्ध आफ्रिका सामने; आयपीएल सुद्धा पुढे ढकलले!

0

करोना विषाणू संसर्गाच्या उपद्रवामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उर्वरीत दोन क्रिकेट सामने पूर्ण रिकाम्या स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह (बीसीसीआय) सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना प्रेक्षक तसेच कुठलीही गर्दी टाळण्याचे निर्देश दिले गेले आहेत. ज्यांनी आधीच तिकिट खरेदी केलेले आहे त्यांचं आठवडाभरात पैसे परत मिळणार असल्याची महितीही बीबीसीआयकडून देण्यात आली आहे.

१५ आणि १८ मार्च ला अनुक्रमे युपीतील लखनौ आणि प बंगालमधील कोलकाता येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये हे दोन सामने खेळवण्यात येणार असून. बंगाल क्रिकेट संघटनेने तिकीट विक्री स्थगित केली आहे, असे संघटनेचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी सांगितले. या आधीचा एक सामना धर्मशाळा येथे होणार होता पण पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रद्द करण्यात आला होता.

कोरोना व्हायरसमुळेच यंदाच्या वर्षीच्या आयपीएलचे आयोजन सुद्धा पुढे ढकलण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. आयपीएल २०२०ची स्पर्धा २९ मार्चपासून सुरुवात होणार होती. मात्र कोरोनामुळे दिल्ली सरकारने दिल्लीमध्ये एकही आयपीएलचे सामने न खेळवण्याचे जाहीर केले. यानंतर बीसीसीआयने आयपीएलचे सामने २९ मार्च ऐवजी १५ एप्रिलपासून खेळवणार असल्याचे जाहीर केले आहे.