काल (८ मार्च) महिला दिनी टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात महिला ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा ८५ धावांनी पराभव केला आणि ५ व्यांदा टी२० विश्वचषकाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. हे विजेतेपद मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाला खूप मोठी बक्षीस रक्कम मिळाली आहे.
या विश्वचषकात आयसीसीने महिला संघांच्या बक्षीस रकमेत ३२० टक्क्याने वाढ केली आहे. म्हणूनच यावर्षीच्या महिला टी२० विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला आयसीसीकडून १ मिलियन डॉलर (अंदाजे ७.४० कोटी रुपये) बक्षीस रक्कम मिळाली आहे.
तसेच उपविजेत्या ठरलेल्या भारतिय संघाला आयसीसीकडून ५,००,००० डॉलर (अंदाजे ३.७० कोटी रुपये) इतकी बक्षीस रक्कम मिळाली आहे. याबरोबरच टी२० विश्वचषक विजेत्या पुरुष संघाला आयसीसीकडून १.६ मिलियन रक्कम मिळत असल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलिया, आयसीसीच्या महिलांसाठी असलेल्या १ मिलियन बक्षीस रकमेत ६,००,००० डॉलरची भर स्वतः हून ऑस्ट्रेलिया महिला संघाला बक्षीस मानधन देणार आहे.