Home खेळ स्पर्धा यंदाचं IPL होणार दुबईमध्ये, सौरव गांगुली यांनी केले स्पष्ट

यंदाचं IPL होणार दुबईमध्ये, सौरव गांगुली यांनी केले स्पष्ट

0

भारतीय क्रिकेटची पंढरी म्हटले जाणारे IPL हे या वर्षीच्या पर्वाला कोरोना मुळे मूकते की काय या निराशेत असलेले भारतीय चाहत्यांना आनंदाची बातमी आली आहे. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यावर्षी IPL नक्की होणार असल्याचे सांगितले आहे.

BCCI ला IPL घेतले नाही तर ४००० कोटी रुपयांचे नुकसान झाले असते, हे होऊ नये म्हणून या वर्षी IPL हे विनाप्रेक्षक दुबई अथवा श्रीलंका या ठिकाणी घेण्याचा प्रस्ताव होता अखेर दुबईच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून तिकडे स्पर्धा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

दुबईमध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात IPL स्पर्धा घेण्याचे ठरले असून या साठी मोठी अडचण असणारी विश्वचषक स्पर्धा रद्द होत असल्यामुळे IPL या कालावधीत घेण्यास कुठलीच अडचण होणार नाही असा BCCI ला विश्वास आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे हे सामने विना प्रेक्षक खेळवले जाणार आहेत. IPL दुबईमध्ये होणे हे काही आपल्याला नवीन नाही या आधी सुद्धा २०१४ मध्ये IPL चे काही सामने दुबईमध्ये खेळवण्यात आले होते. या वर्षी हे IPL चे १३वे पर्व असणार असून मागच्या वर्षीचा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि उपविजेता चेन्नई संघ यांच्या मधील सामना बघण्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.