Home खेळ स्पर्धा IPL 2020: एकाच ओव्हरमध्ये दोन दिग्गज खेळाडूंना बाद करत मोहम्मद शमीने गाठला...

IPL 2020: एकाच ओव्हरमध्ये दोन दिग्गज खेळाडूंना बाद करत मोहम्मद शमीने गाठला नवा विक्रम

0

१५ ऑक्टोबरला झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब या सामन्यात पंजाब संघाने विजय पटकावला. या सामन्याच्या वेळी बँगलोरने प्रथम फलंदाजी करत पंजाबसमोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या विजयात पंजाब संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा मोठा वाटा ठरला. उत्कृष्ट खेळी देऊन शमीने एक खास रेकॉर्ड गाठला.

बंगलोरच्या फलंदाजीच्या वेळी मोहम्मद शमीने एकाच षटकात बँगलोर संघाचे दोन दिग्गज फलंदाज विराट कोहली व ए बी डीविलीअर्स यांना बाद केले. असा विक्रम करणारा मोहम्मद शमी हा आठवा गोलंदाज ठरला. सामन्याच्या पूर्वार्धातील १८वे षटक सुरू असतांना शमीने तिसऱ्या चेंडूत विराटला व पाचव्या चेंडूत डीविलीअर्सला बाद करत हा विक्रम गाठला.