प्राईम नेटवर्क : आपला सर्वांचा लाडका कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी हा त्याच्या ”अचूक निर्णय क्षमता आणि विजेची चपळाई” यासाठी ओळखला जातो. पण आज एका वेगळ्याच कारणाने आपला हा टीम इंडियाचा शिलेदार मोमेंट ऑफ द डे ठरला आहे. वेलिंग्टन येथे सुरू असलेल्या भारत वि न्यूझीलंड अखेरच्या 20-20 सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
पहिल्या सत्राच्या 14व्या षटकात मैदानात अचानक एक चाहता महेंद्रसिंग धोनीच्या दिशेने धावत आला. चाहत्याच्या हातात भारताचा तिरंगा होता. हा चाहता धावत येत धोनीच्या पाया पडण्यासाठी खाली बसला,पण धोनीने हातातला तिरंगा पायाजवळ जाण्यापूर्वीच काढून घेतला. यातून देशप्रेम हे नेहमीच आपल्यापुढे असल्याच पुन्हा एकदा धोनीनं दाखवून दिलं आहे.मैदानातील धोनीच्या या देशप्रेमाबद्दल सगळीकडूनचं कौतुकांचा वर्षाव होत आहे.
दरम्यान,भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्धच्या 20-20 मालिकेत 1-2 असा पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडच्या 213 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना भारताला 6 बाद 208 धावांपर्यंतचं मजल मारता आली. या सामन्यात धोनीला मोठी खेळी साकारता आली नसली तरी त्याने नेहमीप्रमाणे यष्टीमागे आपला दबदबा दाखवला.
टीम इंडियाची सोळाव्या षटकात सहा बाद 145 अशी बिकट अवस्था झाली होती. त्या परिस्थितीत दिनेश कार्तिक आणि कृणाल पंड्यानं सातव्या विकेटसाठी 63 धावांची अभेद्य भागीदारी रचली,पण त्यानंतरही टीम इंडियाला चार धावांनी विजयानं हुलकावणी दिली.
आपल्या माहीचं देशप्रेम..मैदानात आलेल्या फॅनच्या हातातला तिरंगा पायाजवळ जाण्यापूर्वीच काढून घेतला…देश आपल्यापुढे असल्याचं पुन्हा एकदा धोनीनं दाखवून दिलं…