Home खेळ स्पर्धा पाकिस्तानकडे विराट पेक्षाही चांगले खेळाडू आहेत मात्र… : अब्दुल रझ्झाक

पाकिस्तानकडे विराट पेक्षाही चांगले खेळाडू आहेत मात्र… : अब्दुल रझ्झाक

0

माजी पाकिस्तानी ऑलराऊंडर अब्दुल रझ्झाकने नेहमी प्रमाणे  पुन्हा एकदा आता भारतीय खेळाडूंवर बोचरी टीका केली आहे. यापूर्वी त्याने हार्दिक पांड्याला “मी तुला चांगला ऑलराऊंडर बनण्यासाठी मदत करेल” असे वक्तव्य केले होते. तर जसप्रीत बुमराला देखील त्याने ‘बेबी बॉलर’ म्हटले होते. रझ्झाकने कायमच भारतीय खेळाडूंवर निशाणा साधला आहे. आता विराट कोहलीवर रझ्झाकने आपलं मत व्यक्त केलं. एकीकडे त्याने कोहलीवर टिप्पणी केली तर दुसरीकडे पाकिस्तान बोर्डाचीही निंदा केली.

लोकमतच्या एका रिपोर्ट नुसार अब्दुल रझ्झाकने पाक पॅशनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “विराट कोहली एक चांगला खेळाडू आहे. मात्र त्याच्या यशाला बीसीसीआय जबाबदार आहे. बीसीसीआयचा चांगला पाठींबा मिळतो म्हणून तो सरस खेळू शकतो. मिळत असलेल्या सन्मानामुळेच खेळाडूला प्रेरणा मिळते. अन्यथा पाकिस्तानमध्येही अनेक खेळाडू असे आहेत जे विराट कोहलीपेक्षा जास्त चांगले खेळाडू आहेत.” मुलाखती दरम्यान बोलताना रझ्झाक पुढे म्हणाला, “पाकिस्तानमध्ये अनेक खेळाडू आहेत जे भविष्यात विराट कोहलीपेक्षा सरस बनू शकतात. मात्र पाकिस्तानच्या सिस्टिमने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे हे दुर्दैवच. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गुंतवणूक करण्यासाठी तयार झालं पाहिजे” असे रझ्झाक म्हणाला.