Home खेळ स्पर्धा प्रो कबड्डीचा प्रसिद्ध खेळाडू काशीलिंग एडकेला अवैध दारूविक्री आणि जुगार मध्ये पोलिसांनी...

प्रो कबड्डीचा प्रसिद्ध खेळाडू काशीलिंग एडकेला अवैध दारूविक्री आणि जुगार मध्ये पोलिसांनी केली अटक

0

राज्यात लॉकडाऊन सुरू असताना बेकायदेशीर दारू विक्री आणि तीन पत्ती जुगार खेळताना प्रो-कबड्डीपट्टू काशिलिंग रामचंद्र आडकेला पोलिसांनी त्याच्या आठ साथीदारांसह छापा टाकून रंगेहात पकडले. काशिलिंग आडके हा कासेगांव( ता. वाळवा जिल्हा सांगली ) येथील राहत्या घरात तीन पानी पत्त्याचा जुगार व दारुचा अडडा चालवित होता. पोलिसांनी रोख रक्कम , जुगाराचे साहित्य, आरोपींच्या मोटरसायकली व विदेशी दारु असा एकूण १ लाख ६१ हजार, २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

या प्रकरणी पोलिसांनी काशिलिंग रामचंद्र आडके (वय २७) सह पांडुरंग बबन पाटसुते, (वय २८) आरिफ नबीलाल मुल्ला(वय ३२), प्रशांत काकासो बडेकर,( वय २२),अतुल पांडुरंग परीट, (वय ४०), रसीक इसाक नाईकवडी, (वय २३),हर्षद विलास पाटील, (वय २४) सर्व राहणार कासेगांव व जोतीराम शिवाजी पाटील, ( २७ रा. कापूसखेड) यांना अटक केली आहे. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा सर्वजण तीन पानी पत्याचा जुगार खेळत असताना आढळून आले.

काशिलिंग आडके हा स्वतःच्या बंगल्यामध्ये बेकायदेशीर दारु विक्री करतो आणि तीन पानी जुगार अड्डा चालवतो अशी माहिती पोलिसाना मिळाली होती. यावरुन कासेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ, पोहेकॉ पाटोळे, पोहेकॉ पाटील, पोहेकॉ गायकवाड, पोना कारंजकर, पोकॉ. घस्ते, रोकडे व दोन पंच अशा स्टाफसह जावून छापा टाकून कारवाई केली.कासेगांव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४, ५, महाराष्ट्र दारू प्रतिबंध अधिनियम कलम ६५(ई), भा. द. स. कलम १८८, २६९, २७० अन्वये आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोहेकॉ गायकवाड करीत आहेत.