येत्या २७ नोव्हेंबरपासून भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होत आहे. या दौऱ्यात भारत व ऑस्ट्रेलिया संघांमध्ये ३ वन डे, ४ कसोटी, व ३ टी-२० असे एकूण १० सामने होणार आहेत. सध्या सुरु असलेली आयपीएल १० नोव्हेंबरला संपणार असून १४ नोव्हेंबरपर्यंत भारतीय संघाचे खेळाडू ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. मात्र या दौर्यात रोहित शर्मा असणार नाही अशी माहिती लोकसत्ताच्या मीडिया रिपोर्टवरून मिळाली. हे कळल्यावर रोहित शर्माचे क्रिकेट प्रक्षिक्षक दिनेश लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक लाईव्हमध्ये बोलतांना दिणेश लाड म्हणाले, “भारतीय संघातून रोहितला असं वगळणं अनपेक्षित होतं. या गोष्टीचं मला फार वाईट वाटलं. परंतु BCCI ने विचार करूनच हा निर्णय घेतला असेल. त्याला सध्या दुखापत झाली असून ती किती गंभीर स्वरूपाची आहे याची मला कल्पना नाही. ती गंभीर असेल तर त्यानेच BCCI ला त्याबद्दल कळवले असेल.” याशिवाय मुंबई इंडियन्समध्ये खेळात असलेल्या सूर्यकुमार यादवला देखील इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यांसाठी संघातून वगळण्यात आले आहे. त्याबद्दलही दिनेश लाड यांनी नाराजी व्यक्त केली.