Home खेळ स्पर्धा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात अखेर रोहित शर्माची निवड पक्की

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात अखेर रोहित शर्माची निवड पक्की

0

उद्या १० नोव्हेंबरला आयपीएल २०२० चा अंतिम सामना होणार असून त्यानंतर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या दौऱ्यासाठी खेळाडूंची नावे घोषित करण्यात आली होती. त्यावेळी भारतीय संघाचा महत्वाचा आणि आघाडीचा खेळाडू रोहित शर्मा याचे नाव त्या यादीत नव्हते. परिणामी क्रिकेटप्रेमींनी BCCI व निवड समितीवर भरपूर टीका केली होती. मात्र आता रोहित शर्माची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे.

आयपीएलमधील मुंबई इंडियन्स च्या एका सामन्यात रोहित शर्मा जखमी झाला होता. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी घेण्यात आले नव्हते. BCCI ने आयपीएल खेळाडूंचे इंज्युरी रिपोर्ट्स पुन्हा तपासल्यानंतर रोहित शर्मा आता बरा झाला असल्याचे कळले. म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी त्याला संघात घेण्यात आले आहे. तसेच वन डे आणि टी – २० सामन्यांमध्ये त्याला विश्रांती घेण्यास सांगितले आहे.