Home खेळ स्पर्धा सचिन तेंडूलकर आणि ब्रायन लारा आज खेळणार मुंबईत आमने सामने

सचिन तेंडूलकर आणि ब्रायन लारा आज खेळणार मुंबईत आमने सामने

0

“सचिन! सचिन!!” म्हणत ज्या क्रिकेट ग्राउंडने क्रिकेटच्या देवाला अलविदा केला होता आज त्याच मैदानात परत एकदा सचिन खेळणार आहे. तब्बल ७ वर्षांनी मास्टर ब्लास्टर आपल्याला पॅड अप करून मैदानात खेळतांंना दिसणार आहे. निमित्त आहे ‘रोड सेफ्टी सिरीज’ क्रिकेट मालिकेचे. २०१३ मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या सचिनला त्याच्या चाहत्यांनी मनावर दगड ठेऊन अलविदा केला होता पण आपला सचिन परत एकदा खेळणार असल्याचे पाहून चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

सचिन (Sachin Tendulkar) आणि वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा (Brian Lara) रस्ता सुरक्षेसाठी चॅरिटी सामने खेळणार आहेत. दोन्ही संघानी शुक्रवारी कसून सराव केला. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज हा सामना ७ ते २२ मार्च दरम्यान ११ सामने होणार आहेत. आजपासून मुंबईत वानखेडे मैदानावर या सामन्याला सुरुवात होईल.