Home खेळ स्पर्धा साऊथ आफ्रिकेत एकाच क्रिकेट सामन्यात तीन संघ एकमेकांविरुद्ध खेळत आहेत, वाचा काय...

साऊथ आफ्रिकेत एकाच क्रिकेट सामन्यात तीन संघ एकमेकांविरुद्ध खेळत आहेत, वाचा काय आहेत नियम!

0

कोरोनाच्या काळात बंद असलेले क्रिकेट जगत पुन्हा एकदा हळू हळू सुरू होत आहे. आज साऊथ आफ्रिकेने एक अद्भुत सामना समोर आणला असून या क्रिकेट सामन्यात एका वेळी ३ संघ एकाच वेळी खेळणार आहेत. पारंपरिक क्रिकेट मधील दोन संघातील सामना तीन संघांचा करण्यात आल्यामुळे सर्व जग हा सामना कसा असेल याकडे लागले आहे.

काय आहेत नियम?

पहिल्या पर्वात तीन संघ एकमेकांना सामोरे जातील हा सामना ३६ षटकचा असणार असून यामध्ये प्रत्येक संघाला १२ षटक खेळायला मिळणार आहेत, या १२ षटकात ६ षटक एक संघ तर दुसरा संघ ६ असे टाकणार आहेत. एक गोलंदाज फक्त ३ ओव्हर टाकू शकतो.

तर दुसऱ्या पर्वात ज्या संघाने सर्वात जास्त धावा केल्या त्याला प्रथम फलंदाजी करता येईल. या नंतर दोन्ही पर्व झाल्यावर ज्या संघाच्या सर्वात जास्त धावा झाल्या तो विजेता ठरणार आहे.

हा सामना साऊथ आफ्रिका बोर्डाने नियोजित केला असून कोरोना मुळे बाधित झालेल्या लोकांच्या उद्धारासाठी यातून उभ्या राहलेल्या पैशाचा वापर होणार आहे. या सामन्यात साऊथ आफ्रिकेचा विख्यात खेळाडू ABD Villiars सुद्धा एका संघाचे नेतृत्व करत आहे.