Home खेळ स्पर्धा आशिया चषकासाठी पाकिस्तानमध्ये जाणार टीम इंडिया

आशिया चषकासाठी पाकिस्तानमध्ये जाणार टीम इंडिया

0

आशिया क्रिकेट परिषदेच्या कार्यकारी बोर्डाने यावर्षी होणाऱ्या आशिया चषक टी२० स्पर्धेच्या भविष्याबाबतचा निर्णय पुढे ढकलला आहे. कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा स्थगित करण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. आशिया चषकाचे आयोजन सप्टेंबरमध्ये होणार आहे.

या चषकाचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आहे. परंतु भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाण्याची शक्यता नसल्यामुळे या स्पर्धेचे आयोजन झाले, तर ते इतर देशात होईल.

माध्यमांतील काही वृत्तांनुसार, एसीसी म्हणजेच आशिया क्रिकेट परिषद (Asian Cricket Council) ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकाबद्दल आयसीसीच्या निर्णयाची वाट पाहील.

तसेच, त्यानंतर आशिया चषकावर निर्णय घेतला जाईल.
सोमवारी (८ जून) झालेल्या बैठकीनंतर एसीसीने पत्रकार परिषदेत म्हटले, की बोर्डाने आशिया चषक २०२०च्या आयोजनावर भर दिला आहे. कोविड-१९चे प्रभाव आणि परिणाम पाहता, आशिया चषक २०२० च्या संभाव्य जागेसाठी पर्यायांवर चर्चा करण्यात आली आहे. तसेच, वेळ आल्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. खरंतर कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट पूर्णपणे ठप्प पडले आहे. यावर्षी टी२० विश्वचषकाचे आयोजन न होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.