आयपीएल २०२० चे ग्रुप स्टेजचे सामने कालच्या मॅचने पूर्ण झाले. यानंतर प्ले ऑफ साठी कोणते संघ खेळणार हे आता निश्चित झाले आहे तसेच प्ले ऑफच्या सामन्यांच्या तारखाही ठरल्या आहेत. प्ले ऑफमध्ये पोहचणाऱ्या मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, सनराइजर्स हैदराबाद व रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या चार टीम्स आहेत. कालच्या मुंबई विरुद्ध हैदराबाद या मॅचमध्ये हैदराबादने विजय मिळवल्यामुळे ते प्ले ऑफमध्ये स्थान मिळवू शकले. पॉईंट टेबलमध्ये हैदराबाद व कोलकता सारख्या स्थानावर असूनही हैदराबादचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे त्यांना प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित करता आले.
आयपीएल २०२० च्या पॉईंट टेबलमध्ये सध्या मुंबई आघाडीवर असून दिल्ली दुसऱ्या, हैदराबाद तिसऱ्या व बँगलोर चौथ्या क्रमांकावर आहेत. या चार टीम्स प्ले ऑफमध्ये खेळणार असून ५ नोव्हेंबरला मुंबई व दिल्ली या संघांमध्ये सामना होणार आहे. यात जो संघ विजयी ठरेल तो फायनलमध्ये जाईल. तसेच प्ले ऑफचा दुसरा सामना ६ नोव्हेंबरला हैदराबाद व बँगलोर या संघांमध्ये होऊन विजयी संघ फायनलमध्ये दिल्ली व मुंबईपैकी विजयी झालेल्या संघाबरोबर फायनल मॅच खेळेल. १० नोव्हेंबरला फायनल आयपीएल २०२० चा फायनल सामना खेळला जाईल.