जीवघेण्या कोरोनाचा भारतात झालेल्या शिरकावामुळे २९ मार्चपासून खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे. एकीकडे कर्नाटकच्या सरकारने आयपीएल लढतींवरच बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून दुसरीकडे तामिळनाडूमध्ये आयपीएलविरोधात मद्रास हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली गेली आहे.
आयपीएलच्या १३ व्या मोसमाला २९ मार्च पासून सुरुवात होण्याचे नियोजित आहे. २९ मार्च ते २४ मे दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार असल्याचे बीसीसीआय ने सांगितले होते परंतु कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता आयपीएल स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे व यावर बीसीसीआय काय प्रतिक्रिया देते हे पहाणे महत्वाचे ठरते. या स्पर्धेविरोधात वकील जी. या खटल्याची खंडपीठासमोर १२ मार्चला सुनावणी होणार आहे.
या वर्षीची सलामी लढत ही गेल्यावर्षीच्या अंतिम लढती सारखी चेन्नई विरुद्ध मुंबई होणार आहे. यंदाचे हे पर्व महेंद्रसिंह धोनी यांच्यासाठी फार महत्वाचे असून यंदाच्या आयपीएल मधल्या कामगिरीवर त्याचे भारतीय संघातील पुढचे स्थान अवलंबून राहणार आहे.