Home खेळ स्पर्धा विराट कोहली सचिनपेक्षा महान : डिव्हीलीयर

विराट कोहली सचिनपेक्षा महान : डिव्हीलीयर

0

टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि मास्टर महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांच्यात सदैव तुलना होते. एकदा सचिनने देखील माझे विक्रम फक्त विराट आणि रोहित शर्माच मोडू शकतो असे आत्मविश्वासाने सांगितले होते. विराटही क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात धावांचा प्रचंड पाऊस पाडत आहे.

असे असतानासुद्धा विराट आणि सचिनची तुलना होतेच. मात्र दक्षिण आफ्रिकेचा एबी. डिव्हीलिअर्स याने विराट एका बाबतीत सचिनपेक्षा महान असल्याचे म्हंटले आहे.

धावांचा पाठलाग करताना विराट कोहली सचिन तेंडुलकरपेक्षा उत्कृष्ट असल्याचे एबी. डिव्हीलिअर्स याने म्हंटले आहे. ‘क्रिकइंफो’ने याबाबत वृत्त दिले आहे. माजी क्रिकेटपटू आणि समालोचक पॉमी मबांगा यांच्यासोबत इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅट दरम्यान एबी. डिव्हीलिअर्स याने हे मत मांडले आहे.

डिव्हीलिअर्स म्हणाला, सचिन तेंडुलकर आमच्या दोघांचा आदर्श खेळाडू आहे. सचिन आपल्या कारकिर्दीत टॉपवर राहिला आणि तरुण खेळाडूंसाठी एक उत्तम उदाहरण बनला. माझ्या या मताशी विराट कोहली देखील सहमत असेल. पण वैयक्तिकरित्या मला असे वाटते की धावांचा पाठलाग करताना विराट हा सचिनपेक्षा महान आहे. सचिनने प्रत्येक परिस्थितीत वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे, मात्र दबावात असताना धावांचा पाठलाग करताना विराट त्याच्यापेक्षा अव्वल वाटतो, असेही एबी. म्हणाला.