Home खेळ स्पर्धा “2011 चा वर्ल्डकप फायनल आम्ही भारताला विकला होता”, श्रीलंका क्रीडामंत्रीचे खळबळजनक वक्तव्य

“2011 चा वर्ल्डकप फायनल आम्ही भारताला विकला होता”, श्रीलंका क्रीडामंत्रीचे खळबळजनक वक्तव्य

0

२०११ मध्ये श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने वर्ल्डकप फायनल भारताला विकला होता असे खळबळजनक वक्तव्य श्रीलंकेचे तेव्हाचे क्रीडामंत्री महिंदानंदा अलुथगमगे यांनी केले आहे. 2011 वर्ल्ड कपवेळी ते क्रिडा मंत्री होती. महिंदानंदा अलुथगमगे असा दावा करणारे पहिलेच व्यक्ती नसून, या आधी श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी देखील हा सामना फिक्स असल्याचे म्हटले होते. एका वृत्त वाहिनीशी बोलताना अलुथगमगे म्हणाले की, आम्ही २०११ वर्ल्ड कपचा अंतिम सामना विकला होता.

अलुथगमगे हे २०१० ते २०१५ या काळात श्रीलंकेचे क्रिडा मंत्री होते. आता ते अक्षय ऊर्जा आणि शक्ती राज्य मंत्री आहेत. त्यांनी सांगितले की, मला त्यावेळी हा खुलासा करायचा नव्हता. २०११ मध्ये आम्ही जिंकू शकलो असतो, मात्र आम्ही सामना विकला. मी आता याविषयी बोलू शकतो असे मला वाटते. मला खेळाडूंच्या बाबतीत म्हणायचे नाही, मात्र काही गट नक्कीच यात सहभागी होते.

मुंबईत झालेल्या या अंतिम सामन्यात कर्णधार कुमार संगकारानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. महेला जयवर्धने नाबाद 103 आणि संगकाराने 48 चेंडूंत 67 धावा केल्या होत्या. तर श्रीलंकेची धावसंख्या 50 षटकांत 6 विकेट्ससाठी 274 अशी होती. भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खान आणि युवराज सिंगने प्रत्येकी दोन गडी बाद केले होते आणि 275 धावांचा पाठलाग करताना वीरेंद्र सेहवाग (0) आणि सचिन तेंडुलकर (18) वर बाद झाला.

यानंतर 122 चेंडूत गौतम गंभीरने 97 धावांची शानदार खेळी केली. त्याने विराट कोहलीबरोबर 83 धावांची भागीदारी केली. यावेळई धोनीने युवराजसिंगच्या आधी खेळण्याचं ठरवलं होतं. धोनी 91 आणि गंभीरने चौथ्या विकेटसाठी १० धावांची भागीदारी केली होती. यावेळी भारताला विजयासाठी 11 चेंडूत 4 धावांची गरज होती. त्यानंतर धोनीने षटकार खेचत विश्वचषकावर भारताचं नाव लिहिलं होतं.