Home खेळ स्पर्धा “वर्ल्ड कप काही फक्त धोनीच्या षटकाराने जिंकला नाही!” धोनीला सर्व श्रेय दिल्याने...

“वर्ल्ड कप काही फक्त धोनीच्या षटकाराने जिंकला नाही!” धोनीला सर्व श्रेय दिल्याने गौतम गंभीर भडकला

0


२०११ साली मिळालेल्या क्रिकेट विश्‍वविजयाचे सर्व श्रेय कर्णधार महेंद्रसिंग धोनीला देणार्‍या ईएसपीएन या क्रिकेट  वेबसाईटवर त्यावेळच्या संघातील सलामीचा फलंदाज गौतम गंभीर भलताच संतापला आहे, हा विजय कोण्या एकट्या-दुकट्याचा अजिबात नाही तर संपूर्ण संघाचा विजय होता,” असे त्याने सुनावले आहे.


२ एप्रिल २०११ रोजी भारताने दुसऱ्यांदा विश्‍वचषक जिंकला. गुरुवारी ‘त्या’ घटनेला ९ वर्षे पूर्ण झाली. याचेचऔचित्य साधून या वेबसाईटने महेंद्रसिंग धोनीने मारलेला विजयी षटकाराचा फोटो वापरला. त्यावरून गौतम गंभीर भयंकर चिडला आहे.मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील त्या अंतिम सामन्याने कोट्यवधी भारतीयांना आनंद साजरा करण्याची संधी दिली.कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या त्या विजयी षटकारानंतर भारतातील प्रत्येकजण आनंदाने नाचत सुटला होता. भारतीय संघाने तब्बत २८ वर्षांनंतर वन-डे वर्ल्डकप उंचावला तो याच दिवशी; पण या वर्ल्डकप विजयाचे श्रेय फक्त धोनीलाचं दिले गेले.


श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया मोठ्या संकटात असताना सलामीवीर गौतम गंभीर खेळपट्टीवर टिकून उभा राहिला आणि भारताच्या विजयाचा पाया रचला गेला. या ऐतिहासिक दिवसाच्या आठवणींना उजाळा देताना एका वेबसाईटने महेंद्रसिंग धोनीचा विजयी षटकाराचा फोटो वापरला. त्यावरून गौतम गंभीरने ट्विट केले की, “२०११चा वर्ल्डकप हा संपूर्ण देशाने, संपूर्ण इंडियन टीमने आणि सर्व सपोर्ट स्टाफमुळे जिंकला होता, तुमचं फक्त एका मारलेल्या षटकावरचं प्रेम आता पुरे करा!”