गुगलचा Pixel स्मार्टफोन हॅक करणाऱ्याला गुगल तब्बल 1.5 मिलियन डॉलर बक्षीस म्हणून देणार असे जाहीर केले आहे. दीड मिलियन दार म्हणजे तब्बल 10 कोटी 76 लाख रुपये! सिक्युरिटी सुरक्षिततेच्या तपासणीसाठी गुगल कंपनी कायम असे उपक्रम राबवत असते. गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये या उपक्रमाबद्दल सवित्तर माहिती दिली. या आधी गुगलने अँड्रॉईडसाठी बग बाउंटी प्रोग्रामची सुरुवात 2015 मध्ये केली होती. त्यात सहभागी होणाऱ्या 1800 उमेदवारांना चार वर्षात कंपनीने तब्बल 4 मिलियन डॉलर बक्षीस रोख दिले आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार गुगल पिक्सलमध्ये सध्या Titan M चीप बसवण्यात आली आहे. ही सिक्युरिटीच्या बाबतीत अत्यंत सुरक्षित मनाली जाते. त्यामुळे फोन हॅक करून दाखवणाऱ्या गुगल सुमारे 10 कोटींचे बक्षीस देणार देण्यास तयार आहे. गुगलीच्या मते संशोधकांनी या फोनमधील कमतरता शोधून काढावी यासाठी आम्ही हे बक्षित देत आहोत परिणामी आम्हाला आणखीन सुरक्षिततेसाठी काय करायला हवं याच परीक्षण करता येईल व ग्राहकांना आणखी चांगली सुविधा देता येईल.