Home तंत्रज्ञान कार्ड क्लोनिंग काय आहे आणि त्यापासून कसं वाचायचं जाणून घ्या.

कार्ड क्लोनिंग काय आहे आणि त्यापासून कसं वाचायचं जाणून घ्या.

0

जसजसा टेक्नॉलॉजीचा वापर वाढत आहे तसतसे त्यातील धोके ही समोर येत आहेत. याचे उदाहरण म्हणजे सायबर क्राईम. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कार्ड क्लोनिंग हा एक सायबर क्राईमचाच प्रकार आहे. याची आजकाल बरीच प्रकरणे समोर येत आहेत. कार्ड क्लोनिंग मध्ये हॅकर्स किंवा फसवे लोक आपल्या क्रेडिट कार्डची सर्व माहिती जसे कार्ड नंबर, सिव्हीव्ही, एक्सपायरी डेट, पिन ही सर्व माहिती जमा करतात आणि ही सर्व माहिती वापरून एक बनावट कार्ड तयार करतात. त्यामुळे आपल्या खात्यातील पैसे ते कधीही वापरू शकतात.

विशेष म्हणजे कोणी आपल्या कार्डचे क्लोनिंग केले तरी ते आपल्याला समजत नाही. यासाठी कार्ड स्वाईपिंग मशीनसारखे एक मशीन वापरले जाते. या मशीनमध्ये कार्ड स्वाईप केले की आपल्या कार्डची सगळी माहिती ती मशीन सेव्ह करून ठेवते.

अशा प्रकारे कार्डचे क्लोनिंग होऊ नये यासाठी आरबीआयने मॅगस्ट्रीप कार्डच्या जागी ईव्हीएम चिप कार्ड वापरण्याचे निर्देश दिले आहेत. हे कार्ड स्कॅन केले तरी आपली महत्वाची माहिती कुठल्या मशीनला कॉपी करता येत नाही. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी कार्ड वापरतांना आजूबाजूला कॅमेरा असल्यास सतर्क राहावे व आपला पिन क्रमांक टाकतांना दुसऱ्या हाताने झाकावे व कोणाला दिसू देऊ नये असेही निर्देश आरबीआयने दिले आहेत.