Home तंत्रज्ञान या नवीन नियमामुळे भारतात व्हाट्सअप बंद होण्याची शक्यता

या नवीन नियमामुळे भारतात व्हाट्सअप बंद होण्याची शक्यता

0

प्राईम नेटवर्क : अहो मंडळी, चक्कर-बिक्कर येऊन पडलात तर नाहीत ना ? आजकाल सोशल मीडिया म्हणजे ऑक्सिजन बनला आहे. व्हॉट्सएप,फेसबुक, ट्विटरवर एखादी नवीन पोस्ट,मॅसेज नाही दिसला तर बैचेन व्हायला होत…त्यात असलं काही तरी ऐकायला मिळालं तर व्हेेंटिलेेेटरचं मागवायला लागेल ना ?

त्याचं झालंय असं कि, भारतात व्हॉट्सएपचे २०कोटी युजर्स आहेत तर जगभरात १.५ अब्ज युजर्स आहेत आणि व्हॉट्सएप साठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. हुश्श ! मी एकटाच/एकटीच एडीक्ट नाहीये तर व्हॉट्सएपची असं कुणा कुणाला वाटलं बरं?

प्रस्तावित नियम हा खूप चिंतेचा विषय असल्याचे मत व्हॉट्सएप कम्युनिकेशनचे प्रमुख कार्ल वूग यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, सर्वात चिंतेचा विषय मेसेजेसचा शोध घेणे हा आहे. फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्सएप मूलभूत रीत्या एन्ड टु एन्ड अनक्रिप्शसन करते, म्हणजेच मेसेज पाठवणारा व प्राप्त करणारा या दोघांनाच तो वाचता येणार.
मंडळी भारतात काम करत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकार कडून प्रस्तावित केलेले काही नियम लागू करण्यात आले तर मात्र भारतातील व्हॉट्सएपचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. वूग यांनी सांगितले की, या विषयावर भारतात चर्चा करण्यासाठी एक प्रक्रिया सुरु आहे.

थोडक्यात काय मंडळी … आता व्हॉट्सएपचा डायनासोर व्हायला जास्त वेळ नाही लागणार. त्यामुळे सोसल तेवढाच सोशल मीडिया वापरायला काही हरकत नाही… पटतंय ना ???