Home Uncategorized भाजप सेना युती निश्चित…

भाजप सेना युती निश्चित…

0

भाजप- सेना युती एकदाची निश्चित झाली असून सेनेने लहान भावाची भूमिका स्वीकारली आहे. शिवेसेनेने कमी जागा घेऊन समाधान मानलं असून राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदे वाढवून घेण्याचा सेनेचा प्रयत्न आहे. सध्या सेनेचे दहा मंत्री आहेत, त्याजागी किमान १३ मंत्रीपदे मिळावी अशी मागणी शिवसेनेकडून केली जात असल्याचे वार्ताहर सांगत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी फॉर्म्युल्या बाबत मूग गिळले असले तरी मीडिया न्यूज नुसार भाजपने सेनेला १२३ जागा देण्याचे मान्य केल्याचे समजत आहे. दोन्ही पक्षात आज जागावाटपा बद्दल बैठक झाली मात्र त्यातही ३ जागा आणखी मिळावीत व मंत्रीपदे वाढवून मिळावीत असा सेनेचा हट्ट आहे. शिवसेनेचा हा प्रस्ताव अद्याप भाजपने मान्य केलेला नाही.

काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा दौर्यावरून परत आल्यानंतर त्याच दिवशी युतीची घोषणा होईल असे म्हटले जात होते. मात्र आता शाह यांचा दौरा रद्द झाला आहे म्हणून युतीचा निर्णय कधीही होऊ शकतो. या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत जातील असेही मीडिया न्यूज नुसार कळत आहे. युती तर निश्चित झाली पण पुढे काय होणार हे वेळच सांगेल.