बियांका आंद्रेस्कू ही १९ वर्षांची कॅनडाची एक प्रोफेशनल टेनिसपटू ! वयाच्या ७व्या वर्षांपासून या खेळात प्रवीण असणारी ही खेळाडू आज अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी कॅनडातील पहिली महिला ठरली आहे. याशिवाय ग्रँड स्लॅम या स्पर्धेतही महिला एकेरी टेनिस जिंकणारी बियांका ही कॅनडाची पहिली टेनिसपटू ठरली आहे. याहूनही कौतुकाची बाब म्हणजे ग्रँड स्लॅमच्या टॉप टेन खेळाडूंसोबत बियांका आतापर्यंत आठ वेळा खेळली आणि आठही वेळा ती जिंकली. तसेच यावर्षी तिने खेळलेल्या ३८ पैकी ३४ सामने ती जिंकली आहे.
अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात प्रसिद्ध टेनिसपटू सेरेना विल्यम्सला अतिशय अटीतटीचा लढा देऊन बियांकाने विजेतेपद पटकावले.