Home खेळ स्पर्धा “या चिनी लोकांनी जिवंत कुत्रे मांजर खाल्ले आणि यांच्या पापाची सजा आपण...

“या चिनी लोकांनी जिवंत कुत्रे मांजर खाल्ले आणि यांच्या पापाची सजा आपण सर्व उगाच भोगतोय”- इंग्लिश क्रिकेटपटू केविन पिटरसन

0

 संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूच्या प्रचंड भीती खाली वावरत आहे. हजारो लोकांनी स्वतःचा जीव गमावला. या साथीच्या आजारामुळे जणू काही संपूर्ण जग पूर्णतः स्तब्ध झाले आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे टोकियो ऑलिम्पिकही रद्द होणार असे दिसत आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार ‘केव्हिन पीटरसनने’ कोरोना महामारीसाठी चीनला दोषी ठरवलं आहे. एकामागे एक ट्विट करत त्याने चीनवर हल्ला केला आहे. यापूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सुद्धा  चीनला या परिस्थितीसाठी जबाबदार धरले होते. त्याने आपल्या यूट्यूब वाहिनीवर व्हिडिओ शेअर करुन चीनवर जोरदार हल्ला केला.केव्हिन पीटरसनने आधी लिहिले की, “कोरोना कोठे सुरू झाला? कोरोनो विषाणूचा उगम वुहानचा जिथे प्राण्यांचा ओला घाणेरडा बाजार आहे, जेथे मृत आणि जिवंत प्राणी दोन्ही विकले जातात आणि नंतर ते खाल्ले जातात”. 

शोएब अख्तर म्हणाला होता, “तुम्हाला वटवाघुळ खाण्याची किंवा त्याचे रक्त आणि लघवी पिण्याची काही गरज आहे का? यामुळे, हा विषाणू जगभर पसरला. मी चिनी लोकांबद्दल बोलत आहे. त्यांनी संपूर्ण जग अडचणीत आणले आहे. आपण वटवाकूळ, कुत्रे आणि मांजरी कसे खाऊ शकता हे मला समजत नाही. मला खरोखर खूप राग येतो आहे.”अख्तर म्हणाला की, “मी चिनी लोकांच्या विरोधात नाही, परंतु मी त्यांच्या या प्रकारच्या जीवनशैलीविरूद्ध आहे, मी समजू शकतो की ही. त्यांची संस्कृती असू शकते.”
वाचा पिटर्सन याचे ट्विट्स: