स्पेन मधील ११३ वर्षांच्या आजीबाई मारिया ब्रानायस यांनी हसत खेळत कोरोनावर विजय मिळवला आहे, मार्च महिन्यामध्ये त्यांना कोरोणाची लागण झाली होती.
अगदी १०० वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनासारख्याच स्पॅनिश फ्लू या रोगाचा सुद्धा त्यांनी असाच मुकाबला केला होता. या आजीबाईंना ३ मुले, ६० नातवंडे आणि १३ पणतू आहेत. विशेष म्हणजे तिच्या एका मुलाचे वय हे ६० वर्षांचे आहे.
स्पेन मध्ये कोरोनाने मृत्यूचे तांडव करणे सुरूचं आहे, आतापर्यंत अतिभयावह परिस्तिथी मध्ये या आजीबाईंसारख्याच अजून २ शंभरी पार केलेल्या आजीबायांमुळे त्यांच्या देशाला आणि सबंध जगाला कोरोना विरुद्ध लढण्याची नवी उमेद मिळाली आहे.
दरम्यान भारतामध्ये सुद्धा या आजीबाईंसारख्या जिद्दीची आवश्यकता आहे, मार्च महिन्यात सुरू केलेला पहिला लॉकडाउन आता चौथ्या टप्प्यात पोहोचला असून दिवसागणिक रुग्णांची संख्या ही वाढतीचं आहे.