Home जागतिक लोकसभा निवडणूक २०१९ जगातील सर्वात महागडी ठरेल असा अमेरिकेतील तज्ञांचा दावा.

लोकसभा निवडणूक २०१९ जगातील सर्वात महागडी ठरेल असा अमेरिकेतील तज्ञांचा दावा.

0

प्राईम नेटवर्क : यंदाच्या निवडणुकीत भाजपा आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार टक्कर होईल. सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अटीतटीचा असेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च होईल,असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निवडणुकीतील वाढता खर्च लक्षात घेता २०१९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक जगातील सर्वात महागडी ठरेल असा दावा अमेरिकामधील तज्ञानं केला आहे. लवकरच लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. त्याआधीच राजकीय पक्षाकडून प्रचाराचा नारळ फुटला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत ६.५ बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त पैसे खर्च होईल असा दावा मिलन वैष्णव यांनी केला. वैष्णव कार्गी इन्डॉवमेंट फॉर इंटरनॅशनल थिंक टँकच्या दक्षिण आशिया विभागाचे संचालक आहेत. वैष्णव यांच्या दाव्यानुसार, २०१६ मध्ये अमिरेकित झालेल्या निवडणुक खर्चापेक्षा भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा खर्च जास्त असणार आहे. त्यामुळे ही जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरणार आहे.

२०१६ मध्ये अमेरिकेत झालेल्या निवडणुकीत ६.५ बिलियन डॉलर्सचा खर्च आला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत ६.५ बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त पैसा खर्च होईल असा दावा करण्यात वैष्णव यांच्याकडून करण्यात आला आहे. जर हा दावा खरा ठरला तर २०१९ लोकसभा निवडणुक जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरेल.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चात ५५ ते ६० टक्के वाढ, तर राजकीय पक्षांच्या खर्चात २९ ते ३० टक्के वाढ होईल, असा अंदाज या अहवालात व्यक्त केला आहे.’येत्या निवडणुकीचा निकाल काय असेल, याची कल्पना नाही. मात्र ही निवडणूक जगातील सर्वात महागडी असेल, याबद्दल शंका नाही’ असं वैष्णव म्हणाले.