भारत- चीन आणि भारत- पाकिस्तान तणाव बघता चिनच्या सततच्या चालु असणाऱ्या कुरघोडींमुळे भारतही आता योग्य ते पाउल उचलत आहे. भारताने २०१६ साली फ्रान्स बरोबर ५९ हजार कोटींचा ३६ रायफल विकत घेण्याचा करार केला आहे. त्यामुळे आता ‘राफेल’ फायटर विमानांच्या तुकडीने फ्रान्समधून भारतात येण्यासाठी उड्डाण घेतले आहे.
पहिल्या तुकडीत एकूण पाच विमाने आहेत. ‘राफेल’ फायटर विमान हे बुधवारी (२९ जुलै) ७ हजार किमी अंतर पार करून भारतात प्रवेश करणार आहे.
हे विमान हरियानामधीन अंबाला एअर फोर्स स्टेशनवर असणार आहे. भारताला या विमानांची शेवटची तुकडी २०२१ मध्ये मिळणार आहे ,तसेच ती विमाने अधिक पॉवर फुल होण्यासाठी त्यामध्ये हमेर मिसाइल लावण्यात येत आहे.