Home जागतिक भारत आणि रशियामध्ये झाला करार! लडाख सीमेवर भारत चीन तणाव कायम.

भारत आणि रशियामध्ये झाला करार! लडाख सीमेवर भारत चीन तणाव कायम.

0

भारत आणि चीन मध्ये चालू असलेल्या तानावा दरम्यान भारताने राशियासोबत एक खूप मोठा करार केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मॉस्को च्या यात्रादरम्यान भारत आणि रशियाने अत्याधुनिक एके-203 रायफल भारतात तयार करण्याबाबत एक मोठा करार केला आहे. अशी माहिती रशियाच्या मीडियानुसार मिळाली आहे.

एके-203 रायफल ही एके-47 रायफल चा नवीनतम आणि सर्वाधिक महत्त्वपूर्ण व उपयुक्त आहे. ही ‘इंडियन स्मॉल ऑर्म्स सिस्टम’ 5.56×45 मिमी रायफलची जागा घेईल.

भारतीय थल सेनेला सद्या 770,000 एके-203 रायफलची गरज आहे, ज्यामध्ये 1 लाखांची आयात केली जाईल आणि उरलेल्यांची निर्मिती भारतात केली जाईल अशी माहिती रशियाच्या सरकारी वृत्त एजंसी स्पुतनिक कडून मिळाली आहे.

त्या बातमीनुसार बातमीनुसार या रायफल्सना भारतात संयुक्त उद्यम भारत-रशिया रायफल प्राइवेट लिमिटेड अंतर्गत तयार करण्यात येईल. याची स्थापना आयुध निर्माणी बोर्ड आणि कलाशनीकोव कंसर्न वा रोसोबोरेनेक्सपोर्ट यांच्यामध्ये झाली आहे.