जगाच्या सर्व कानाकोपर्यातील सूत्रे हलवणारा बलाढ्य अमेरिका कोरोनसमोर पराभूत झाला आहे तब्बल १ लाख नागरिकांना कोरोना ची लागण झाली असून १५४४ लोकांचे मृत्यू झाले आहेत.
जॉन हॅपकिंग विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीच्या नुसार गेल्या २४ तासामध्ये अमेरिकेत सुमारे १८ हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ३४५ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ७१७ एवढा झाला आहे.कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ ट्रिलियन डॉलरच्या मदत पॅकेजची घोषणा केली आहे. या मदत पॅकेजच्या माध्यमातून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीची भरपाई केली जाणार आहे.
गेल्या चार दिवसात अमेरिकेत कोरोनाचे ५० हजार नवे रुग्ण आढळले आहेत. तर जगात आतापर्यंत ५ लाख ९१ हजार ८०२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी २६ हजार ९९५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख २९ हजार ७९० जण उपचारानंतर बरे झाले आहे.
कोरोनाची लागण झालेल्याच्या यादीत इटली दुसऱ्या स्थानी आहे. इटलीत आतापर्यंत गेल्या २४ तासात इटलीत ९१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर जागतिक नाणेनिधी संघटनेने जगामध्ये महाभयंकर आर्थिक मंदी येणार असल्याचे संकेत दिले आहेत. ही आर्थिक मंदी २००९ पेक्षा सुद्धा खुप जास्त तीव्र असणार आहे असे नानेनिधींच्या अध्यक्षांनी सांगितले.