Home जागतिक दहशतवादाचा निर्धाराने मुकाबला करण्यात अमेरिका भारत सरकारसोबत !

दहशतवादाचा निर्धाराने मुकाबला करण्यात अमेरिका भारत सरकारसोबत !

0

प्राईम नेटवर्क : पाकिस्तानने तत्काळ सर्व दहशतवादी संघटनांना अभय देत पोसणे थांबवावे, असा कडक संदेश देत,अमेरिकेने जम्मू-काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा धिक्कार केला.

सर्व दहशतवादी संघटनांचा उद्देश अनानोंदी, हिंसाचार आणि दहशतीचे बीजारोप करणे आहे. तेव्हा पाकिस्तानने आपल्या भूमीतील दहशतवादी कारवाया चालविणाऱ्या सर्व दहशतवादी संघटनांना गोंजरणे आणि पोषण करणे त्वरित थांबवावे,असे आवाहन व्हाइट हाउसच्या प्रसिद्धी सचिव सारा सँडर्स यांनी केले.

हल्ल्याच्या म्होरक्यांच्या पाठिशी पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तचर संस्थाच असावी, असा दाट संशय दक्षिण आशियाशी संबंधित अमेरिकी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या दहशतवादी हल्ल्यातून जैश आणि अन्य दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई करण्यासाठी अमेरिका पाकिस्तानला राजी करण्यात अपयशी ठरल्याचे दिसते.

दहशतवादी हल्ल्याने दहशतवादविरोधी लढ्यात अमेरिका आणि भारतादरम्यान सहकार्य आणि भागीदारीचा आमचा संकल्प आणखी दृढ होतो. या अघोरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे कुुटुंबीय, भारत सरकार आणि भारतीय जनतेप्रती आम्ही अतीव दु:ख व्यक्त करतो, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रसिद्धी सचिव सँडर्स यांनी म्हटले आहे.

सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निर्धाराने मुकाबला करण्यात अमेरिका भारत सरकारसोबत आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.अमेरिकेच्या विदेश विभागाचे उप-प्रवक्ते रॉबर्ट पलाडीनो यांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. दहशतवादांना सुरक्षित अभय आणि पाठिंबा देऊ नये, तसेच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावासंदर्भातही आपापली जबाबदारी पार पाडावी, असे आमचे सर्व देशांना आवाहन आहे. तेव्हा पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी हे एक मोठे आव्हान असेल.