Home जागतिक सलग दुसऱ्या दिवशी देखील अमेरिकेकडून इराकवर हवाई हल्ला: ६ ठार, ३...

सलग दुसऱ्या दिवशी देखील अमेरिकेकडून इराकवर हवाई हल्ला: ६ ठार, ३ गंभीर जखमी

0

भारतीय वेळेनुसार 4 जानेवारी रोजी अर्थात आज अमेरिकेकडून पुन्हा एकदा इराकवर हवाई हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात आता पर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहिती नुसार अमेरिकेने उत्तरी बगदादवर हा हल्ला केला असून सहा जणांच्या मृत्यूसह अनेकजण जखमी झाले आहेत त्यापैकी तीन जण गंभीर आहेत. या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये इराण समर्थक मिलिशिया हश्द अल शाबीच्या काही लोकांचा समावेश आहे अशी माहिती मिळत आहे.

यापूर्वी अमेरिकेने भारतीय वेळेनुसार शुक्रवार 3 जानेवारी रोजी इराकची राजधानी अर्थात बगदादच्या विमानतळावर हवाई हल्ला करून इराणच्या कद्स फोर्सचे प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याला ठार केले आहे. आज सलग दुसरा हल्ला केवळ इराकचेच नाही तर जगाचे वातावरण बिघडण्याची चिन्ह आहेत. हे हल्ले केव्हाही मोठ्या युद्धाचं रूप घेऊ शकतात असे अंदाज केले जात आहेत. इराण आता गप्प बसणार नाही अशीही शक्यता वर्तवली जात आहे.