ऑस्ट्रेलियातील जंगलात भीषण आग लागली असून आगीत खूप नुकसान झाले आहे. सुमारे 5 कोटी पेक्षा जास्त प्राण्यांनी आपले प्राण गमावले तर 18 लोकांचा मृत्यू झाला व त्याचबरोबर आगीत 200 घरे उध्वस्त झाली अशी माहिती न्यूज 18 लोकमतने दिली. तेथील अग्निशमन दल मोठ्या शर्थीने आग विजवण्याचे प्रयत्न करीत असून यात हेलिकॉप्टरचा देखील वापर केला जात आहे. सोशल मीडियावर नेटकरी याबद्दल हळहळ व्यक्त करीत आहेत
ही आग नैसर्गिक कारणांमुळे लागली असं सांगितलं जात जास्त असून ऑस्ट्रेलियातील यंदाच्या दुष्काळाने तापमान खूपच वाढले होते. परिणामी कडक ऊन आणि हवेमुळे आग लागली व झपाट्याने पसरली. अस म्हटलं जातं आहे. अनेकांना या भीषण आगीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले असून काही लोक आगीच्या वेढ्यात अडकले आहेत व त्यांनाही काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. ही आग विझवण्यासाठी सुमारे 74 हजार कर्मचारी झुंज देत आहे अशी देखील माहिती मिळत आहे.