चीनचे राष्ट्राध्यक्ष झी जिनपिंग यांनी काल त्यांच्या सैन्याला सर्व आघाड्यांवर युध्दासाठी सज्ज राहा असे आदेश दिले आहेत
पीपल्स लिब्रेशन आर्मी च्या वार्षिक बैठकी वेळी चीनच्या राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी सैन्यदलाच्या प्रमुखांना सदर सूचना दिल्या आहेत.
चीनच्या पीपल्स लिब्रेशन आर्मी च्या सदस्यांच्या मते कोरोना महामारीचा फायदा घेत त्यांनी त्यांच्या लष्करात नवा दम भरायला हवा तसेच सर्व आघाड्यांवर कितीही मोठ्या कठीण प्रसंगी मात करता येईल अशी तयारी ठेवायला हवी.
चिनी वृत्तपत्रे या सैन्याला दिलेल्या चेतावणीचा सरळ संबंध भारताशी लावतात, त्यांच्या मते
गेल्या काही दिवसात भारताने सीमेवर अनेक अनधिकृत बांधकामे केलेली आहेत, भारतीय सैन्य चीनच्या हद्दीत घुसू पहात आहे. या सर्वांवर अंकुश राहावा म्हणून चीन ने युद्धाची तयारी केली असून परिस्तिथी सुधारली नाही तर युद्धाचा भडका उडू शकतो!