चीनने १ लाख बदकं त्याच्या मित्रराष्ट्र पाकिस्तानला पाठवली. यामागचं कारण म्हणजे पाकिस्तानमधला पिकांवर पडलेला टोळधाडीचा हल्ला. पंतप्रधान इम्रान खान यांच्या मते मागच्या एका दशकातील हा सर्वात भयंकर हल्ला आहे. पूर्वी आफ्रिकेतून आलेल्या या टोळधाडीचा पाकिस्तान मुक्काम पडला असून त्यांनी पिकांवर फडशा पाडला आहे. त्यामुळे पाकिस्तानातील शेतकरी हवालदिल झाला आहे. चीन मधील झिजिअंग प्रांतात नव्याने पैदास केलेल्या या बदकांचा या टोळधाडीवर वापर करण्यात येणार आहे.
हिंदुस्थान टाइम्सच्या रिपोर्ट नुसार चीनमधील शेती तज्ज्ञांची एक चमू आधीच पाकिस्तानच्या पंजाब आणि बलोच प्रातांत रवाना झाली आहे. लु लुझी जे झिजिअंग प्रांतात शास्त्रीय अभ्यास करतात. त्यांच्या मते, “एक कोंबडी दिवसाला ७० धाडी खाते तर एक बदक २००!”
हे बदक सैनिक त्यांचे काम आटोपल्यानंतर पाकिस्तानी जेवणात मेजवानी म्हणून वापरले जातील हा त्यांचा दुसरा फायदा!