Home आरोग्य कोरोना विषाणू करतोय मेंदूवर घातक परिणाम, वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा

कोरोना विषाणू करतोय मेंदूवर घातक परिणाम, वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा

0

जगभरात कोरोना विषाणू हा फक्त फुफ्फुस केंद्रित आजार असल्याचे सांगितले जाते मात्र ब्रिटन मधील संशोधकांनी एक अतिशय धक्कादायक माहिती उजेडात आणली आहे, त्यांनी ब्रेन या विज्ञान मासिकात विश्लेषण केल्या प्रमाणे फक्त फुफ्फुस नाही तर शरीरातील किडनी, यकृत या सोबतचं मेंदूवर अतिशय घातक परिणाम करत असल्याचे समोर येत आहे.

विज्ञान मासिकामध्ये दिलेल्या माहितीनुसार, ” एखाद्या व्यक्तीला कोरोना होऊन गेल्यावर थोडे दिवसांनी हळू हळू त्या व्यक्तीच्या मेंदूवर अतिशय घातक परिणाम होत असल्याचे आमच्या संशोधनात दिसून येत आहे”

लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये असणाऱ्या 19 कोरोना विषाणू बाधित व्यक्तींना acute demyelinating encephalomyelitis (ADEM) हा मेंदूचा गंभीर आजार झाल्याचे दिसून आले आहे. हा आजार हळू हळू चेता संस्थेवर परिणाम करत करत मेंदूवर परिणाम करू लागतो आणि रुग्णाला साध्या सोप्या गोष्टी म्हणजे उदाहरण द्यायचे झाल्यास आकडेमोड करणे, एखादी गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत अवघड होऊन बसते असा या संशोधकांनी निष्कर्ष काढला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मेंदूवर होणारे हे परिणाम कोरोना झाल्यानंतर बरे होऊन गेल्यावर थोड्या दिवसांनी जाणवायला लागतात, त्यामुळे कोरोना विषाणू हा कुठल्या जैव युद्धाचा भाग तर नाही ना या विषयी शंका कुशंका घेतल्या जात असून, सदर बाबतीत अधिकचे संशोधन विविध देशात सुरू आहे.