Home जागतिक डोनाल्ड ट्रम्प भारतभेटीला, पंतप्रधानांसोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर करणार चर्चा

डोनाल्ड ट्रम्प भारतभेटीला, पंतप्रधानांसोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर करणार चर्चा

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अर्थात डोनाल्ड ट्रम्प येत्या 24 ते 25 फेब्रुवारी दरम्यान भारतात येणार आहेत. व्हाईट हाऊसच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून मंगळवारी पोस्ट करून याची घोषणा केली गेली. या ट्विट नुसार डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी व एका महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी भारतात येणार आहेत. न्यूज 18 लोकमतच्या रिपोर्टनुसार या भेटीमुळे अमेरिका व भारत यांच्यातील भागीदारी आणखी मजबूत होईल व कायमस्वरुपी संबंध देखील अधिक मजबूत होतील. असे सांगितले जात आहे

मिळालेल्या अधिक माहितीनुसार परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी 16 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे एका संमेलनादरम्यान बोलतांना सांगितले की,

“अनेक महिन्यांपासून अशी अटकळ बांधली जात आहे; पंतप्रधान मोदींनी जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतली तेव्हा त्यांना भारतात आमंत्रित केले होते. दोन्ही देश आमच्याशी संपर्क साधत आहे. जेव्हा आम्हाला ठोस माहिती मिळेल तेव्हा ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल.”

अर्थात आता ट्रम्प येणार हे निश्चित झाले असून ही भेट दोनही देशांसाठी महत्वाची असेल.