जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू पडणाऱ्यांची संख्या अनेक पटीने वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसागणिक प्रचंड पसरत चालला आहे. कोरोनाच्या विळख्यात सर्वाधिक वयोवृद्ध लोक सापडत असल्याचं दिसून येतं. मात्र कोरोनाच्या जाळ्यात युवा वर्गही अडकलेला आहे. या लोकांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
लंडनमध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय तारा लँगस्टनचा हा व्हिडीओ आहे. यात ती सांगते की,” सुरुवातीला मी कोरोना व्हायरसला अजिबात गंभीरतेने घेतले नाही. पण आता कोरोनाची लागण मला झाल्याने पुन्हा असं व्हायला नको असं वाटते.जर कोणीही संधी घेण्याचा विचार करत असेल तर माझी अवस्था पाहा”
व्हिडीओ बनवतांंना तिने सांगितले आहे की, “सध्या मी तुमच्याशी निदान बोलू तरी शकते ही अवस्था पूर्वीपेक्षा दहापटीने अधिक चांगली आहे”. कोरोनामुळे तिच्यावर काय संकट आलं हे तिच्या अवस्थेकडे पाहून अंदाज लावता येतो. ताराने मेल ऑनलाइनशी बोलताना सांगितले की, “माझ्या फुफुस्सामध्ये काच अडकल्यासारखं वाटतं, पहिल्यांदा मला वाटायचे की कोरोना व्हायरसला गरजेपेक्षा अधिक धोकादायक दाखवलं जातं आहे. मात्र कोरोना झाल्यानंतर मला पुन्हा असं कधी होऊ नये असं वाटू लागलं आहे,हा खूप वेदनादायक अनुभव आहे. त्यामुळे लोकांनी कोणतीही चूक करु नये अन्यथा त्यांची अवस्था माझ्यासारखी होईल” असं आवाहन तिने केलं.
पहा तिचे संपूर्ण मनोगत