Home जागतिक इन्स्टाग्राम युजर्सवर फोन कॅमेराद्वारे पाळत ठेवल्याबद्दल फेसबुकवर खटला दाखल

इन्स्टाग्राम युजर्सवर फोन कॅमेराद्वारे पाळत ठेवल्याबद्दल फेसबुकवर खटला दाखल

0

मार्क झुकरबर्गच्या सोशल मीडिया कंपनी फेसबुकवर कोणत्याही परवानगीशिवाय इंस्टाग्राम युजर्सवर कॅमेऱ्याद्वारे पाळत ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी फेसबुकवर खटला दाखल झाला आहे. याआधी जुलै महिन्यात देखील फेसबुकवर असा आरोप करण्यात आला होता. परंतु हा आरोप फेसबुकने फेटाळून लावला होता. तेव्हा फेसबुक फेस-रेकॉग्निशन टेक्नॉलॉजी वापरत नसल्याचे फेसबुकने सांगितले होते.

इन्स्टाग्राम युजर ब्रिटीनी काँडीटी हिने सॅन फ्रान्सिस्कोच्या फेडरल कोर्टात ‘फेसबुक कंपनी इन्स्टाग्राम ऍपद्वारे फोनच्या कॅमेऱ्याचा वापर करून युजर्सचा खाजगी आणि महत्वपूर्ण डेटा हेतुपूर्वक जमा करत आहे’ अशी तक्रार केली आहे. यावर फेसबुकने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मीडिया न्यूजमधून ही माहिती मिळाली.