सगळे जग कोरोना वायरसच्या संकटाखाली आहे, जगभरातील लोक भीतीच्या वातावरणात जगत आहेत, मात्र भारतात हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी कोरोना व्हायरस वर तोडगा म्हणून ‘गोमुत्र प्राशन पार्टी’ आयोजित केली होती. यासंबंधीचा एक व्हिडीओ आघाडीचा चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप याने ट्विटरच्या हँडलवर शेअर केला आहे.
हिंदू महासभेतील कार्यकर्त्यांनी कोरोना रोगापासून पूर्ण बचावासाठी आयोजित केलेल्या ‘गोमुत्र पार्टीत’ गोमुत्र पिल्याने कोरोना ठणठणीत बरा होतो असा दावा करताना काही कार्यकर्ते दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मिडीयामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. तसेच त्यावर अनेक प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. या विडिओ मध्ये हिंदू महासभेचे कार्यकर्ते सांगत आहेत की, “आम्ही सरकारकडे अशी मागणी करत आहोत की विमानतळांवर मिळत असणाऱ्या दारुवर बंदी घालण्यात यावी व त्याचएवजी गोमुत्र आणि गोबर ठेवण्यात यावं, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देखील आम्ही गोमुत्र पाठवणार आहोत, त्यासाठी आम्ही पंतप्रधान मोदींकडे जात आहोत, पंतप्रधान स्वतः आवडीने गोमुत्र घेतात.” या दाव्यांची सोशल मिडीयावर खूप जास्ती खिल्ली उडवण्यात आली आहे. त्या व्हिडीओला ‘अच्छे दिन’ असं कॅपशन देऊन अनुरागने तो ट्विट केला आहे.
अनुराग कश्यप हा विविध सामाजिक मुद्द्यांवर कायम बोलत आहे, तो सोशल मिडीयावरती मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. नागरिकता कायद्याच्या विरोधात सुद्धा देखील तो सातत्याने त्याचं मत मांडत राहीला आहे. त्याच्या या ट्विटला देखील जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे