भारताला reliance नावाचा हिरा देणारे धीरुभाई अंबानी यांचे सुपुत्र मुकेश अंबानी हे नुकतेच जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले असून त्यांनी अमेझॉन चे CEO झेफ बेसॉस यांना सुद्धा मागे टाकले आहे, त्यांनी आज jio meet मध्ये केलेल्या घोषणांनी आता त्यांचे लक्ष्य लवकरच पहिल्या क्रमांकावर जाण्याचे आहे हे दिसून येते.
मुकेश अंबानी हे सद्या आशियातील सर्वात श्रीमंत तर जगातील ६व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असून त्यांच्या एकट्याकडे 7000 करोड रुपयांची मालमत्ता आहे, त्यांच्या या अफाट श्रीमंतीमुळे त्यांना भारताचा आधुनिक कुबेर सुद्धा म्हटले जाऊ लागले आहे. आज Reliance ची वार्षिक बैठक पार पडली यामध्ये त्यांनी 2021 पर्यंत भारतात Jio 5G सेवा सुरू करेल अशी घोषणा त्यांनी केली त्या सोबतच जागतिक दर्जाची कंपनी गूगल हिने reliance मध्ये 33000 करोड रुपयांची गुंतवणूक केली असल्याची घोषणा सुद्धा त्यांनी केली आहे, मागच्या काही दिवसात facebook ह्या कंपनीने सुद्धा reliance मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
भारतीय बाजारातील प्रत्येक उपभोग्य वस्तूमध्ये मुकेश अंबानी यांच्या Reliance चा नफ्याचा खारीचा वाटा आहे असे बोलले जाते, उदाहरण घ्यायचे झाल्यास रोज सकाळी आपण दात घासण्याचे टुथपेस्ट आणि ब्रश वापरत असाल ते कुठल्याही कंपनीचे असले तरी त्यामध्ये वापरले जाणारे प्लास्टिक हे reliance ने विकलेलेलं असते. सुरवातीच्या काळात फक्त पेट्रोलियम क्षेत्रांत उतरलेल्या मुकेश अंबानी यांनी हळू हळू सर्व क्षेत्रात पाय पसरवायला सुरवात केली आणि आज अनेक क्षेत्रांमध्ये त्यांची एकहाती सत्ता आहे, टेलिकॉम सेक्टर मधीक jio च्या घवघवीत यश मिळवल्यानंतर त्यांनी देशात retail market मध्ये उडी घेतली आहे, सोबतच ज्वेलरी, electronics यांच्या स्टोअर्स ची मोठी शृंखला देशभरात विणली आहे. मुकेश अंबानी यांच्या या एकहाती सत्तेमध्ये त्यांच्या discount परंपरेचा प्रचंड मोठा वाटा आहे.
अंबानी यांच्या ह्या भारतीय बाजारातील एकहाती सत्तेमागे अनेक छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना आणि उद्योजकांना मिळालेली तिलांजली सुद्धा आहे, reliance च्या ह्या अफाट आणि अमर्याद ताकदी समोर सामान्य माणूस स्पर्धा करू शकत नाही हे निश्चित त्यामुळे अंबानी ह्यांच्या श्रीमंत होण्याचा गर्व बाळगावा की भीती ही गोष्ट विचार करण्या लायक आहे!