Home जागतिक पाकिस्तान तसेच उत्तर भारतात तीव्र भूकंपाचे धक्के

पाकिस्तान तसेच उत्तर भारतात तीव्र भूकंपाचे धक्के

0

दिल्ली, उत्तर भारत तसेच पाकिस्तानच्या सीमेवर आज दुपारी भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल इतकी होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आणि सर्वांना घराबाहेर पडावे लागले.

उत्तर भारतातील दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये तसेच पाकिस्तानमध्येही आज दिनांक २४ सप्टेंबरला दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. काश्मीरमधील उधमपूर, रामबन, पुंछ, जम्मू येथील काही भागांतही नागरिकांनी भूकंपाचे धक्के अनुभवल्याचे सांगितले. पाकिस्तानात धक्क्यांचे प्रमाण तीव्र असून मिरपूर येथे ५ लोक मृत्युमुखी पडले आणि ५० लोक जखमी झाले असे मीडिया न्यूजमधून समोर आले आहे. तसेच काही भागात वाहने उलटली असून रस्त्यांवर भेगा पडल्याचेही समजते. पाकिस्तानातील रावळपिंडी हा या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे वर्तविण्यात येत आहे.