Home आरोग्य कोरोनानंतर चीनमध्ये अजून एका व्हायरसची भर…

कोरोनानंतर चीनमध्ये अजून एका व्हायरसची भर…

0

कोरोना व्हायरसचा चीनमध्ये उगम झाला, हजारो लोकांनी प्राण गमावल्यानंतर या व्हायरस मुळे झालेली परिस्थिती जराशी सुधारत असतांना चीनमध्ये एका नवीन व्हायरस मूळे सगळ्यांची झोप उडाली आहे. कोरोना व्हायरस मुळे चीनमध्ये ३००० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

कोरोनाने थैमान घातलेल्या युनान प्रांतात प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे संचारबंदी हटवण्यात आली. त्यामुळे कामगार आपल्या कामावर परतू लागले आहेत. कामावर जाणाऱ्या अशाच एकाचा चालत्या बस मध्ये मृत्यू झाला. त्याच्या तपासणी नंतर त्याचा मृत्यू ‘हंता’ व्हायरस ने झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या सहप्रवाश्यांचे रक्ताचे नमुने सुद्धा पॉसिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मीडिया न्यूजनुसार या व्हाइरासमुळे या आधीदेखील चीनमधील लोकांचा मृत्यू झाला आहे.

काय आहे हंता व्हायरस रोग?

हा व्हायरस उंदीर, घुशी यांच्यामार्फत पसरणारा रोग असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा होतो. उंदरांनी घरात नुसते आत बाहेर जरी केले तरी हा व्हायरस पसरण्याचे प्रमाण प्रचंड वाढते. हा व्हायरस प्रचंड जीवघेणा असून याची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता ३८% नी वाढते. 
हंता व्हायरस रोगाची लक्षणे:
ताप, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, उलटी, डायरिया आदी.