कोरोनाच्या वाढत असलेल्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडलेल्या आपल्या मित्रराष्ट्र पाकिस्तानची चीननं खूप मोठी फसवणूक केली आहे. पाकिस्तान आपल्याकडून वैद्यकीय मदत पाठवण्याचं आश्वासन चीननं याआधी दिलं होतं. मात्र चीननं पाठवलेले वैद्यकीय साहित्याचे खोके पाकिस्तानला पोहोचले आणि त्यांना उघडून पाहिल्यानंतर पाकिस्तानला जबरदस्त धक्का बसला.चीननं एन-९५ च्या मास्कच्याऐवजी अंडरवेअरपासून तयार केलेले मास्क पाकिस्तानला पाठवले. चीन पाठवत असलेले मास्क हे अतिशय निकृष्ट दर्जाच्या असल्याच्या तक्रारी अनेक युरोपातल्या देशांनी याआधी केल्या आहेत. स्पेन आणि नेदरलँडनं चीनकडून पाठवण्यात आलेलं वैद्यकीय साहित्य वापस पाठवलं होतं.
कॉरोनापासून रक्षणासाठी ३ लेयर मास्क किंवा एन-९५ मास्क हा अत्यंत प्रभावी आहे. कोरोनापासून रक्षण करण्यासाठी एन-९५ मास्क पाठवण्याचं आश्वासन काही दिवसांपूर्वी चीननं पाकिस्तानला दिलं होतं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चीनचे गुणगान गाताना दिसत होते. मात्र सध्या तरी या स्तुतीचा कोणताही फायदा पाकिस्तानला होत असलेला दिसत नाही. चीनने पाठवलेली मदत पाहून पाकिस्तानच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना खुप मोठा धक्का बसला. चीननं अंडरवेअरपासून तयार केलेले मास्क पाठवल्यानं रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. विशेष म्हणजे सिंध प्रांतातल्या सरकारनं कोणतीही तपासणी करता चीनकडून आलेली वैद्यकीय मदत थेट रुग्णालयांमध्ये पाठवून दिली.
वैद्यकीय मदत पाठवण्यासाठी गिलगिट-बाल्टिस्तानची सीमाभाग त्यांच्यासाठी उघडण्यात यावा असं याआधी चीननं म्हटलं होतं. शिजियांग प्रांतातून वैद्यकीय मदत पाठवायची असल्याचं चीनच्या दुतावासानं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला सांगितलं होतं. चीननं स्वत:हून मदत देण्याची तयारी दर्शवली आणि पाकिस्तान सरकार अतिशय आनंदी झाले. मात्र अंडरवेअरपासून तयार करण्यात आलेले मास्क पाठवण्यात आल्यानं त्यांच्या या आनंद उन्मळून पडला