Home जागतिक पाकिस्तानने उठवले लॉकडाऊन, बोलतात आम्ही भिकेला लागलो

पाकिस्तानने उठवले लॉकडाऊन, बोलतात आम्ही भिकेला लागलो

0

कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी भारतासारखा लॉकडाऊन चा प्रयोग पाकिस्तान ने केला होता मात्र आता काही आठवड्या नंतरचं कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अत्यन्त वाईट असताना तेथील लॉकडाऊन हे संपुष्टात येणार आहे.

पाकिस्तानमध्ये आज सकाळपर्यंत २७,४७४ रुग्ण कोरोनाबधित आहेत, आणि तेथील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे, असे असताना सुद्धा पाकिस्तान सरकारने तेथील लॉकडाउन हटवण्याचा निर्णय घेतला आहे, याला कारण देत पाकिस्तानी सरकार म्हणाले की, “आमच्याजवळचे सगळे पैसे संपले आहेत आणि ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे पोट आम्ही भरण्यासाठी आम्ही असक्षम आहोत. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला हा लॉकडाऊन उठवावा लागेल”.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हतबल होत लोकांसमोर वक्तव्य केले की त्यांनी सगळ्यांना मदत करण्याचे पूर्ण प्रयत्न केले असून ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत अशा लोकांना ते आता काहीच मदत करू शकणार नाहीत. इम्रान खान यांच्यावर तेथील जनतेने मशिदी उघड्या ठेवण्यासाठी प्रचंड दबाव आणला होता, मशिदी सुरू केल्यामुळे कोरोनाचा प्रभाव अधिकाधिक वाढतंच चालला आहे.

पाकिस्तानने सर्वाना लॉक डाउन उठवत असलो तरी सुरक्षित अंतर पाळा असे आवाहन करत आहे आणि तसे न झाल्यास लॉकडाऊन परत सुरू करण्यात येईल असे सांगितल्या जात आहे मात्र, त्यांची झालेली आर्थिक कोंडी पाहता, हे होणे नक्कीचं असंभव वाटत आहे.