Home अर्थजगत पेट्रोल, डिझेल सात रुपयांनी महाग?

पेट्रोल, डिझेल सात रुपयांनी महाग?

0
petril

नुकतीच भारतीय मंदीची चर्चा शांत होते न होते की जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी सौदी अरामकोवर ड्रोन हल्ला झाला आहे. परिणामी सोमवारी ब्रेंट क्रूडच्या किमती तब्बल २८ टक्क्यांनी वाढल्या. आज आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडच्या किमतींमध्ये १९.५ टक्क्यांनी वाढ झाली असून मागील वीस वर्षात किमतींमध्ये झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. अर्थात कच्चे तेल महाग झाल्यामुळे भारतावरही याचा मोठा परिणाम होण्याची नाकारता येणार शक्यता नाही.

भारतातही तज्ञ मंडळींचे सांगतात की पुढील काही दिवसात देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होऊ शकते. एकंदरीत येत्या पंधरा दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रति लिटर मागे ५ ते ७ रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता मुळीच नाकारता येणार नाही.सौदी अरब येथील अरामको कंपनीवर ड्रोन हल्ला झाल्यानंतर तेथील सर्व तेल कंपन्यांनी उत्पादनात घट केली अशी माहिती मिळत आहे. हल्ला झाला त्या तेल विहिरी दुरुस्त करण्यासाठी म्हणून येते काही दिवस उत्पादन कमी होणार असल्याचे सौदी तेल कंपन्यांनी स्पष्ट सांगितले आहे व याची झालं आता सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच महागात पडणार आहे.